आशिया कपमध्ये या कारणामुळे दीपक हुड्डाला गोलंदाजी दिली नाही, रोहित शर्माने केला रणनीतीबद्दल मोठा खुलासा..

भारतीय क्रिकेट संघ सुपर ४ मध्ये सलग दुसरा सामना गमावून आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. पाकिस्तान विरुद्ध पहिला पराभव पत्करल्या नंतर भारताने श्रीलंके विरुद्धचा दुसरा सामनाही जवळपास त्याच पद्धतीने गमावला. प्रथम फलंदाजी करताना भारताने धावसंख्या उभारली आणि नंतर गोलंदाजांना त्याचा बचाव करता आला नाही. श्रीलंके विरुद्ध च्या सामन्यात भारताने दमदार पुनरागमन केले होते, मात्र नंतर गोलंदाजांनी अनेक धावा दिल्या त्यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला.
यादरम्यान कर्णधार रोहित शर्माने कबूल केले की त्याला मोठ्या बाउंड्रीचा फायदा घ्यायचा होता आणि दीपक हुड्डाला चेंडू द्यायचा होता परंतु उजव्या हाताचा फलंदाज क्रीजवर उपस्थित असल्याने तो हुड्डाला गोलंदाजी देऊ शकला नाही. सामन्या नंतर शर्मा म्हणाला की, श्रीलंकेने ज्या पद्धतीने सुरुवात केली त्यानुसार आम्ही शेवटच्या षटका पर्यंत सामना नेला ही चांगली गोष्ट आहे. मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंनी आम्हाला विकेट मिळवून दिल्या. फिरकीपटूंनी आक्रमक गोलंदाजी केली पण श्रीलंकेनेही आपली पकड कायम ठेवली होती.
मोठ्या बाउंड्री मुळे आपण फिरकीपटूंचा चांगला वापर करू शकू असे आम्हाला वाटले होते. पण योजना कामी आली नाही, त्यांचे उजव्या हाताचे फलंदाज बराच वेळ फलंदाजी करत राहिले. यादरम्यान रोहितने सांगितले की, मला तीन वेगवान गोलंदाजांचा वापर करायचा आहे. रोहितने कबूल केले की प्रथम फलंदाजी करण्यास भारताला १० ते १५ धावा कमी होत्या.
संघात तीन वेगवान गोलंदाज आहेत का, असा प्रश्न रोहितला विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला की, संघात आवेश खान असता पण त्याची तब्येत बरी नाही. रोहितचे म्हणणे आहे की आवेश खान फिटनेस टेस्ट पास करू शकला नाही. तो आजारी असल्याने तो बरा होत होता. आम्ही सहसा चार वेगवान गोलंदाजां सोबत जातो पण विश्वचषकापूर्वी आम्हाला तीन गोलंदाजही आजमावायचे आहेत. पाच गोलंदाजां सोबत कसे खेळायचे, याची एक संघ म्हणून काही उत्तरे शोधावी लागतील. या टीम कॉम्बिनेशनसह आम्ही कुठे उभे आहोत हे आता आम्हाला समजले आहे. या पराभवांची फारशी काळजी करण्याची गरज नाही कारण आम्ही फक्त दोनच सामने गमावले आहेत. गेल्या विश्वचषका नंतर आम्ही फारसे सामने गमावलेले नाहीत. या पराभवा मधून आपण धडे घेणार आहोत.
T-२० विश्वचषका पूर्वी भारत अजूनही आपला संपूर्ण संघ मैदानात उतरू शकला नाही आणि रोहित म्हणतो की संघ काही प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. मात्र, गेल्या टी-२० विश्वचषका नंतर टीम इंडियाने फारसे सामने न गमावल्याने आशिया चषक स्पर्धेत भारताने सलग दोन सामने गमावले आहेत याची चिंता करायची नाही. रोहित म्हणतो, हे दोन सामनेही जवळचे होते. डेथ ओव्हर्स मध्ये चांगली गोलंदाजी करण्याचे श्रेय अर्शदीप सिंगला जाते. चहल आणि भुवनेश्वर कुमार सीनियर वेगवान आहेत आणि गेल्या काही काळा पासून संघासाठी चांगली कामगिरी करत आहेत.